NALCO Bharti 2026: नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड मध्ये 268 जागांसाठी बंपर भरती; येथे करा ऑनलाईन अर्ज!
नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड मध्ये “ऑपरेटर, टेक्निशियन,ज्युनिअर फोरमन आणि इतर नॉन-एक्झिक्युटिव्ह” पदाची 268 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
National Aluminum Company Limited Bharti 2026 साठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. जर तुम्ही 10 वी उत्तीर्ण,ITI (Electrician),डिप्लोमा असाल, तर ही संधी सोडू नका. खाली या भरतीचा सविस्तर तपशील, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया दिली आहे.
सरकारी नोकरीची इच्छा बाळगणाऱ्या उमेदवारांसाठी एक उत्तम संधी चालून आली आहे. नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड (NALCO) अंतर्गत विविध नॉन-एक्झिक्युटिव्ह पदांसाठी अधिकृत भरतीची घोषणा करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 268 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. आयटीआय (ITI) आणि डिप्लोमा धारक उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत.
महत्त्वाची नोंद:
- अर्ज सुरू होण्याची तारीख: 21 मे 2026
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: 10 जून 2026
NALCO Recruitment 2026 Overview
| वैशिष्ट्ये (Criteria) | तपशील (Details) |
|---|---|
| मंडळाचे नाव (Board Name) | नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड (NALCO) |
| एकूण पद संख्या (Total Vacancies) | 268 जागा |
| पदांचे नाव (Post Name) | ऑपरेटर, टेक्निशियन, फिटर, ज्युनिअर फोरमन आणि इतर नॉन-एक्झिक्युटिव्ह पदे. |
| शैक्षणिक पात्रता (Education) | १० वी उत्तीर्ण + संबंधित ट्रेडमध्ये ITI किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Sc (केमिस्ट्री). |
| वयोमर्यादा (Age Limit) | किमान १८ वर्षे आणि कमाल २७ ते ४० वर्षांपर्यंत (पदानुसार भिन्न). [SC/ST उमेदवारांना ०५ वर्षे तर OBC उमेदवारांना ०३ वर्षे सूट राहील.] |
| पगार / वेतनमान (Salary) | ₹२९,५००/- ते ₹१,१५,०००/- प्रतिमहिना (पदानुसार नियमाप्रमाणे) |
| अर्ज शुल्क (Application Fee) | General/OBC/EWS: ₹१००/- SC/ST/PWD/ExSM: फी नाही. |
| नोकरीचे ठिकाण (Job Location) | संपूर्ण भारत (All India) |
| अर्ज करण्याची पद्धत (Apply Mode) | ऑनलाईन (Online) |
पदांचा सविस्तर तपशील (Post Wise Details)
- SUPT(JOT)-Operator & Operator Gr. III: 109 जागा
- SUPT(JOT)-Fitter & Technician (Fitter): 25 जागा
- SUPT(JOT)-Electrical & Technician (Electrical): 70 जागा
- Mining Mate Gr. III: 21 जागा
- Junior Foreman (Mines / Electrical): 11 जागा
- इतर विविध पदे: 32 जागा
निवड प्रक्रिया (Selection Process)
या भरतीसाठी उमेदवारांची निवड प्रामुख्याने संगणकावर आधारित परीक्षा (CBT) आणि पदानुसार आवश्यक असणारी ट्रेड टेस्ट / स्किल टेस्ट यांच्या आधारे केली जाईल. यानंतर मूळ प्रमाणपत्रांची पडताळणी (Document Verification) आणि वैद्यकीय तपासणी केली जाईल.
महत्त्वाच्या लिंक्स (Important Links)
- महत्त्वाची तारीख: अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन असून शेवटची तारीख 10 जून 2026 आहे.

Leave a Comment / प्रतिक्रिया दें
0 Comments